पवारांवर सूडबुद्धीने कारवाई नाही -मुख्यमंत्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्यामध्ये कुणाची भूमिका काय आहे, याची चौकशी सुरू आहे. सूडबुद्धीने कोणावरही कारवाई केली नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

नवी मुंबईतील सानपाडा येथील वडार समाज भवनाला मुख्यमंत्र्यांनी बुधवारी भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. 

हायकोर्टाने मुंबई पोलिसांच्या तक्रारीनुसार, ६० जणांवर हा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा घोटाळा १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने आपोआप तो ईडीच्या नियंत्रणात येते.त्यामुळे इडी हस्तक्षेप करते. आमचा त्यांच्याशी  काही संबंध नाही.

Leave a Comment