गॅस सिलेंडर पोहचले ६११ रुपयांवर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- घरगुती सिलेंडरच्या दरात आजपासून ( मंगळवार ) वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात १५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात १५ रूपये ५० पैशांची वाढ करण्यात आली होती. दरवाढीनंतर नगरमध्ये सिलेंडरच्या दरात ५९८ रुपयांवरून ६११ रुपये भाव झाले. दुसरीकडे ओएनजीसी आणि इंडियन ऑईल लिमिटेडद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत कमी करून ३. २३ डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट केल्याची माहिती पेट्रोलिअम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलकडून देण्यात आली.

१ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे नवे दर लागू असतील. मुंबई आणि चेन्नईमध्ये १४.२ किलोच्या सिलेंडरसाठी अनुक्रमे ५७४. ५० रूपये आणि ६२० रूपये मोजावे लागणार आहेत. तर कोलकात्यामध्ये १४. २ किलोच्या सिलेंडरसाठी ६०५ रूपये मोजावे लागतील. १९ किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत दिल्लीत १ हजार ८५ रूपये, तर मुंबईत १ हजार ३२ रूपये इतकी झाली आहे.

Leave a Comment