बलात्काराच्या आरोपानंतर सभापतींचा राजीनामा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : नेपाळच्या संसदीय सचिवालयात कार्यरत एका महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाल्यामुळे सभापती कृष्णा बहादुर महारा यांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे. संसदेचे उपसभापती शिवमय तुम्बाहम्फे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपुर्द केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, असे सांगत कृष्णा बहादुर यांनी स्वत: निर्दोष असल्याचा दावा केला आहे. परंतु याचवेळी महिला कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपांची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे. दुसरीकडे, ‘हाम्रो कुरा’ नामक एका स्थानिक न्यूज पोर्टलने कथित बलात्कारपीडित महिलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

कृष्णा बहादुर यांनी आपला विनयभंग केला, आपल्याशी वारंवार असभ्य तसेच आक्षेपार्ह वर्तन केले, असा आरोप पीडितेने या व्हिडिओत केला आहे. यापूर्वी अनेक वर्षांपासून आपल्यासोबत कृष्णा बहादुर यांनी गैरवर्तन केले आहे. गेल्या २३ सप्टेंबर रोजी आपल्या भाड्याच्या खोलीला कृष्णा बहादुर यांनी भेट दिली. यावेळी मी एकटीच होते. हीच संधी साधत त्यांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना रोखण्यासाठी धडपडत होते; परंतु तरीही त्यांनी माझ्याशी जबरदस्तीने अतिप्रसंग केल्याची कबुली पीडितेने दिली आहे.

Leave a Comment