#BLOG…अन्यथा गडाखांवर पुन्हा पराभवाची धुळ चाखण्याची वेळ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच माजी आमदार शंकराव गडाख यांनी तालुक्यात जनसंपर्क सुरू केला आतापर्यंत त्यांनी तालुक्यातील गावं अन् गाव आणि वाडी पिंजून काढली आहे.

तालुक्यात त्यांचे सुमारे दोन दौरे झाले असून तिसरा दौरा अंतिम टप्प्यात आलेला आहे मागील पाच वर्षात आमदारकी असताना शंकराव गडाख यांच्याकडून दुरावलेली माणसे परतण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे.

ही माणसे आपल्यापासून का दुरावली याचे उत्तर मात्र त्यांनी अद्याप शोधले नाहीत दुरावलेले जवळ येत आहे आणि जवळचे दूर जात आहे ही परिस्थिती मागील पाच वर्षात होती तीच या पाच वर्षात झालेली आहे.

काही झालं तरी या निवडणुकीत विजय खेचून आणायचा असा निश्चय माजी आमदार शंकराव गडाख व त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे पूर्ण गडाख कुटुंबिय पायाला भिंगरी लावत तालुक्यातील गाव नागाव फिरत आहे प्रत्येक घरात भेटी देत आहे.

क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती नेवासा नगरपरिषदेत आपले उमेदवार निवडून आणून एक प्रकारे गडाख यांनी चांगले काम केले आहे ही त्यांची जमेची बाजू असली तरी गडा खान भोवती असलेली चांडाळ चौकडी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्यापर्यंत पोहोचून देत नाही

या चौकडी मुळेच सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्ते गडापासून दुरावलेले आहेत दुरावलेल्यांना  त्यांनी आता समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे परंतु काहींचे मनोमिलन झालेल्या इतर काहींचे अद्याप होणे बाकी आहे

भोवतालची माणसे हटवली तर त्यांना उज्वल भविष्य आहे अन्यथा मागील निवडणुकीप्रमाणे त्यांना पुन्हा परभावाची  धूळ चाखावी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे शंकराव गडाख यांनी सोनई पाणी योजनेचा प्रश्नावर लढा देऊन या परिसरातील मतदारांना आपलेसे केलेले आहे.

ही त्यांची जमेची बाजू आहे कार्यकर्त्यां बरोबरच त्यांचे काही नातलगही त्यांच्यापासून दुरावलेले आहेत त्यांना आपलेसे करण्यात  गडाख कुटुंबीयांकडून  प्रयत्न कमी प्रमाणात झालेले आहे.

शंकरराव गडाख यांनी यशवंतराव गडाख यांनी निवडणुकीच्या काळात सगळ्याच सोयरे  धायरे एकत्र करून त्यांना प्रचाराच्या कामी लावले होते परंतु या निवडणुकीत गडा खान पासून नातलग दूर असल्याचे जाणवत आहे त्याचा फटकाही त्यांना बसण्याची शक्यता दिसून येत आहे कार्यकर्त्यांसह  गडाखांना नातलगांची सात महत्वाची ठरणार आहे.

गडाख यांच्या जवळ असलेली काही मंडळी त्यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करून त्यांना मतदार व नातलगांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे याच मंडळींनी मागील निवडणुकीतही त्यांना अंधारात ठेवले होते तसाच प्रकार पुन्हा सुरू झालेला आहे दुधाने तोंड भाजल्यानंतर माणूस पाठवून कुंठ या म्हणीप्रमाणे आता त्यांनी कारभारात सुधारणा करणे गरजेचे आहे.

दिवस थोडे सोंगे फार या म्हणीप्रमाणे गडाखांना  नाराजांची नाराजी काढून सर्वांची एक मोट बांधून विजयश्री खेचून आणायचा आहे त्या सत्यासाठी त्यांना जवळील चौकट दूर करावी लागणार आहे तरच क्रांतिकारी चा झेंडा विधानसभेत फडकेल अन्यथा पराभवाची धुळ चाखण्याची वेळ येईल.

Leave a Comment