ईडीने शरद पवारांवर केलेली कारवाई योग्य !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने केलेली कारवाई योग्यच असून, त्यांचे पाप झाकण्याचे काम कोणी करू नये. पवार यांना पुढील दोन वर्षात जेलमध्ये घालण्याचे काम करणार असून पाटबंधारे खात्यातील त्यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे, असा घणाघात खा. सुजय विखे यांनी केला आहे.

नगर जिल्ह्यातील राहुरी येथे महायुतीचे उमेदवार आ. शिवाजी कर्डिले यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी आ. कर्डिले, सुभाष पाटील, विक्रम तांबे, शरद बाचकर, पुरुषोत्तम आठरे, रफीक शेख, ऍड. मिर्झा मनियार, रावसाहेब तनपुरे, बाळासाहेब अकोलकर,

शिवजी सागर, सत्यजित कदम, सुरेंद्र थोरात, उदयसिंह पाटील, दादा सोनवणे, आसाराम ढूस, रावसाहेब साबळे, विलास शिंदे, हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग, सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते.

खा. विखे म्हणाले की, शेतकरी, ऊस उत्पादकांचा तळतळाट पवार कुटुंबीयांनी घेतला आहे. त्याची परतफेड पवार कुटुंबीयांना करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाविषयी कुणीही सहानुभूती दाखवू नये, असेही ते म्हणाले.

केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. कर्डिले आणि विखे यांची युती कायम आहे, ती तुटणार नाही. त्यामुळे आमचे कान कोणी भरू नयेत. जिल्हा 12-0 करणार असून कर्जत-जामखेड मधून पालकमंत्री राम शिंदेच निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Leave a Comment