मला पाठबळ देवून राज्यात नवा इतिहास घडवा – राधाकृष्ण विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहाता :- तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधताना मी कुठेही कमी पडलो नाही. मतदार संघाचा चेहरामोहरा बदलतानाच सर्वसामान्य माणसाचे हित जोपासण्याचे काम केले.

भविष्यात रोजगार निर्मिती बरोबरच पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेला वळविणे, निळवंडे धरणाचे पाणी जिरायती भागात उपलब्ध करून देणे आणि गोदावरी कालव्यांच्या कामाचा अजेंडाच आपल्या समोर आहे. हे काम करण्यासाठी मला पाठबळ देवून, राज्यात नवा इतिहास घडवा, असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदारांना केले आहे.

शिर्डी विधानसभा मतदार संघातून आपला निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर राहाता येथे संपन्न झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात राधाकष्ण विखे पाटील बोलत होते.

याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, नंदकुमार जेजुरकर, अशोक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अॅड. नारायणराव कार्ले, म कुंदराव सदाफळ, शिवाजीराव गोंदकर,

शिवसेनेचे नानाभाऊ बावके, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सभापती हिराबाई कातोरे, विजयराव कोते, नगराध्यक्ष ममता पिपाडा, प्रकाशराव जगताप, संजय सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

अर्ज दाखल करण्यापुर्वी मंत्री विखे पाटील यांनी लोणीचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यांचे कुटुंबियांसमवेत दर्शन घेतले.

ना. विखे पाटील म्हणाले, भविष्यात रोजगार निर्मिती बरोबरच पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेला वळविणे निळवंडेचे पाणी उपलब्ध करून देणे व गोदावरी कालव्यांचे काम करणे हाच विकासाचा अजेंडा असन या माध्यमातन स्व. खासदार पद्मभषण बाळासाहेब विखे पाटील यांची स्वप्नपूर्ती करून मतदार संघाचा विकास साधणार आहे.

मी केव्हाही व्यक्तिगत द्वेषाचे राजकारण केलं नाही. मतदार संघाच्या विकासासाठी सवांची मोट बाधली असून सर्वांचा योग्य तो सन्मान ठेवून, यापुढेही मतदार संघाची वाटचाल राहणार असल्याने कोणीही चिंता करण्याची गरज नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले. 

Leave a Comment