पारनेरमध्ये भाजपकडून बंडखोरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी भाजपचे कार्यकारिणी सदस्य वसंत चेडे, बसपचे जितेंद्र साठे, जनता पार्टीचे प्रसाद खामकर व वंचित बहुजन आघाडीचे दगडू शेंडगे यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ९ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल झाले.

चेडे यांच्यासमवेत विश्वनाथ कोरडे, पोपट लोंढे, कृष्णाजी बडवे, सुभाष दुधाडे, बबन डावखर, नगरे, नगराध्यक्ष वर्षा नक्षरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, बबन डावखर, बाळासाहेब नरसाळे, विश्वास रोहोकले, बंटी रोहोकले, नंदकुमार देशमुख, अर्जुन भालेकर, मालन शिंदे हे जुने पदाधिकारी उपस्थित होते. बहुजन समाज पार्टीच्या वतीने जितेंद्र ममता साठे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दगडू रामजी शेंडगे, तर जनता पार्टीच्या वतीने प्रसाद बापू खामकर यांनी अर्ज दाखल केले. प्रमुख उमेदवारांनी आधीच अर्ज दाखल केल्यामुळे शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात फारशी वर्दळ नव्हती.

गुरुवारी अर्ज दाखल केलेल्या सुजित झावरे व संदेश कार्ले यांनी अर्ज दाखल करताना राहून गेलेली काही कागदपत्रे शुक्रवारी सादर केली. सेनेचे आमदार विजय औटी, राष्ट्रवादीचे नीलेश लंके यांच्याबरोबरच बसपाचे जितेंद्र साठे, वंचितचे दगडू शेंडगे, जनता पार्टीचे प्रसाद खामकर हे पाच उमेदवार रिंगणात राहणार आहेत. झावरे व कार्ले यांच्यापैकी एक महाआघाडीच्या वतीने रिंगणात उतरणार असून चेडे यांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.


Leave a Comment