निवडणुकीतून आता माघार नाही, निर्णयाशी विखेंचा संबंध नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोपरगाव :- शहर पन्नास वर्षांत दोन कुटुंबांच्या ताब्यात सत्ता असताना पाणी प्यायला मिळत नसेल, तर शरम वाटली पाहिजे. मी कोणाच्या एका विरोधातला नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. व्यक्तीद्वेषाने निवडणूक लढवत नसून तालुक्यातील जनतेच्या मनातील स्वप्नपूर्तीसाठी निवडणूक लढवत आहे.

निवडून दिलेला उमेदवार शासनाचा पैसा जनतेच्या विकासासाठी खर्च करत असेल, तर तो उपकार करत नाही, अशा शब्दांत गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी आमदार कोल्हेंवर टीका केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विवेक परजणे, राजेंद्र बापू जाधव, सोमनाथ दहे, पुणतांब्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे, हिरालाल महानुभाव, ज्ञानदेव गुढगे, संजय नागरे, सोमनाथ दहे, बाबासाहेब फटांगरे, श्याम कर्ण होन, बाळासाहेब कडू, ज्ञानदेव कासार, विलास कासार, राम जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

परजणे म्हणाले, विखेंचे नेतृत्व आम्ही स्वीकारले. मात्र, आमचे निर्णय आम्हीच घेतो. विखे नातेवाईक असतील, तर त्यात आमचा दोष काय? नातेवाईक होणे पाप नाही. ते त्यांच्या पक्षाचे काम करत आहे. निवडणुकीचा निर्णय माझा आहे. त्यात विखेंचा संबंध नाही, हे अगोदर तालुक्यातील मंडळींनी लक्षात घ्यावे. मी निवडणूक लढवणारच असून आता माघार नाही.

Leave a Comment