जिल्ह्यातील 12 मतदारसंघातून 116 उमेदवार निवडणूक रिंगणात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत निवडणूक रिंगणात असणार्‍या उमेदवारांमध्ये सर्वाधिक 17 उमेदवार नेवासा मतदारसंघात आहेत. त्या खालोखाल 14 कोपरगाव, नगर आणि कर्जत-जामखेड 12, श्रीरामपूर आणि श्रीगोंदा प्रत्येकी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सर्वात कमी 5 उमेदवार शिर्डी मतदारसंघात आहेत.

जिल्ह्यात यंदा 53 अपक्ष निवडणूक रिंगणात असून यात अवघ्या दोन महिलांचा समावेश आहे. भाजप पक्षाने दोन महिलांना संधी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील 12 मतदारसंघांतून अवघ्या 4 महिला विधानसभेच्या आखाड्यात नशिब आजमावत आहेत.

नगर शहर मतदारसंघात 12 निवडणूक रिंगणात 12 उमेदवार आहेत. यात अनिल रामकिसन राठोड (शिवसेन), बहिरुनाथ तुकाराम वाकळे (कम्युनिस्ट पार्टी), श्रीपाद शंकर छिंदम (बसपा), संग्राम अरूण जगताप (राष्ट्रवादी), संतोष नामदेव वाकळे (मनसे), किरण गुलाबराव काळे (वंचित आघाडी), मिर असीफ सुलतान (एआयएमआयएम), 5अपक्ष उमेदवार आहेत.

श्रीगोंदा मतदारसंघात 5 अपक्षांनी माघार घेतल्याने 11 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात घन:शाम प्रतापराव शेलार (राष्ट्रवादी), बबनराव भिकाजी पाचपुते (भाजप), सुनिल लक्ष्मण ओहोळ (बहुजन समाज पार्टी), बाळु अप्पा जठार (पीझंटस अ‍ॅन्ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया), गोपीनाथ घोस टिळक (संभाजी ब्रिगेड पार्टी), तात्याराम बलभिम घोडके (बहुजन मुक्ती पार्टी), मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर (वंचित आघाडी), 4 अपक्ष. कर्जत-जामखेड मतदारसंघात 4 उमेदवारांनी माघार घेतल्याने 12 उमेदवार आता रिंगणात आहेत. यात आप्पासाहेब नवनाथ पालवे (मनसे), प्रा. राम शंकर शिंदे (भाजप), रोहित पवार (राष्ट्रवादी), भैलुमे शंकर मधुकर (बहुजन समाज पार्टी), अरूण हौसराव जाधव (वंचित आघाडी), सोमनाथ भागचंद शिंदे (जनहित लोकशाही पार्टी) व 6 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे

अकोले मतदारसंघात एका अपक्षासह 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात डॉ. किरण यमाजी लहामटे (राष्ट्रवादी), वैभव मधुकरराव पिचड (भाजप), दीपक यशवंत पथवे (वंचित) व एक अपक्ष. संगमनेर मतदारसंघात 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात विजय उर्फ बाळासाहेब थोरात (काँग्रेस,), साहेबराव रामचंद्र नवले (शिवसेना), शरद ज्ञानदेव गोर्डे (मनसे), बापूसाहेब भागवत ताजणे (वंचित आघाडी), संपत मारूती कोळेकर (बहुजन मुक्ती पार्टी), यांच्यासह 3 अपक्ष. शिर्डी मतदारसंघात 5 उमेदवार रिंगणात आहेत. यात शिमोन ठकाजी जगताप (बहुजन समाज पार्टी), सुरेश जगन्नाथ थोरात (काँग्रेस), राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील (भाजप), विशाल बबन कोळगे (वंचित आघाडी) व एक अपक्ष).

कोपरगाव मतदारसंघात 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी), आ. स्नेहलता बिपीन कोल्हे (भाजप), माधव सखाराम त्रिभुवन (बहुजन समाजपार्टी), शिवाजी पोपटराव कवडे (बळीराजा पार्टी), शीतल दिगंबर कोल्हे (हिंदुस्थान जनता पार्टी), राजेश नामदेवराव परजणे (अपक्ष), विजय सूर्यभान वहाडणे (अपक्ष) व अन्य 7 अपक्षांचा समावेश आहे.

श्रीरामपूर मतदारसंघ अखेरच्या दिवशी 21 अपक्षांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात 11 उमेदवार आहेत. यात भाऊसाहेब मल्हारी कांबळे (शिवसेना), लहू नाथा कानडे (काँगेस), भाऊसाहेब शंकर पगारे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), अशोकराव रामचंद्र आल्हाट-(जनहित लोकशाही पार्टी), सुधाकर दादा भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), सुरेश एकनाथ जगधने (एआयएमआयएम), अ‍ॅड. गोविंद बाबुराव अमोलिक (बहुजन समाज पार्टी), रामचंद्र नामदेव जाधव (अपक्ष, श्रीरामपूर तालुका जनसेवा विकास मंडळ) व 3 अपक्ष.

नेवासा मतदारसंघात 3 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी), बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे (भाजप), विश्वास पौलस वैरागर (बहुजन समाज पार्टी), सचिन रामदास गव्हाणे (मनसे), कारभारी विष्णू उदागे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), कारभारी रामचंद्र धाडगे (राष्ट्रीय संत संदेश पार्टी), शशिकांत भागवत मतकर (वंचित आघाडी) व 10 अपक्ष.

राहुरी मतदारसंघात अखेरच्या दिवशी 5 उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात 7 उमेदवार आहेत. यात शिवाजी भानुदास कडिर्ले (भाजप), प्राजक्त प्रसादराव तनपुरे (राष्ट्रवादी), राजेंद्र दादासाहेब कर्डिले (अपक्ष), चंद्रकांत उर्फ संजय प्रभाकर संसारे (अपक्ष), रावसाहेब राधुजी तनपुरे (अपक्ष), सुरेश उर्फ सुर्यभान दत्तात्रय लांबे (अपक्ष), विनायक रेवणनाथ कोरडे (अपक्ष).
शेवगाव मतदारसंघात 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 9 उमेदवार रिंगणात आहेत. यात मोनिका राजीव राजळे (भाजप), अ‍ॅड. प्रतापराव बबनराव ढाकणे (राष्ट्रवादी), किसन जगन्नाथ चव्हाण (वंचित आघाडी), धीरज मोतीलाल बताडे (राईट टु रिकॉल पार्टी), सुभाष त्रिंबक साबळे (बहुजन समाज पार्टी), 3अपक्ष.

पारनेर मतदारसंघात 3 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने 6 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात विजयराव भास्करराव औटी (शिवसेना), नीलेश ज्ञानदेव लंके (राष्ट्रवादी), जितेंद्र ममता साठे (बहुजन समाज पार्टी), इंजिनिअर डी.आर. शेंडगे (वंचित बहुजन आघाडी), प्रसाद बापू खामकर (जनता पार्टी)व अपक्ष).


Leave a Comment