या पद्धतीने करा तुमच्या गर्लफ्रेन्डला प्रपोज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रेमात पडणे ही खुप सुखद भावना असते.प्रेमात पडल्यावर तुम्ही लगेच तिच्यासोबत लग्न करणार आहात की रिलेशनशिपमध्ये रहाणार आहात हा निर्णय महत्वाचा असतो.निर्णय पक्का झाला की तिला तुमच्या मनातल्या भावना सांगणे हे तुमच्यासाठी खुप मोठे आव्हान असू शकते.आता पूर्वीप्रमाणे गुडघ्यावर बसून प्रपोज करत तिच्या उत्तराची वाट बघण्याचा काळ कधीच मागे पडलाय.त्यामुळे प्रपोज करण्यासाठी तुम्हाला जरा हटके पद्धत वापरता यायला हवा.

या पाच पद्धतीने करा तुमच्या गर्लफ्रेन्डला प्रपोज-

स्नॉकलींग करताना प्रपोज…

जर तुमच्या जोडीदाराला पाण्याची आवड असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकते.स्नॉर्कलींग साठी योग्य जागा निवडा व तिला तिथे घेऊन जा.पाण्यात गेल्यावर अचानक तिच्या बोटात रिंग घाला.पण हे सर्व करताना रिंग तुमच्या कडून हरवणार नाही याची काळजी घ्यायला विसरु नका.

रोमॅन्टीक स्विमींग पूल डेट

जर तुम्हाला यासाठी स्नॉर्कलींग करणे शक्य नसेल तर स्विमींग पूल चांगला पर्याय ठरु शकतो.एखादा रिसॉर्टची निवड करा अथवा जर तुमच्या घरीच स्विमींगपूल तर तिथे देखील तुम्हाला हा प्रयोग करता येईल.वातावरण रोमॅन्टीक करण्यासाठी पूलच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका व आजूबाजूचा परिसर फुग्यांनी सजवा.पाण्यामध्ये फ्लोटींग कॅन्डल्स सोडा व मंद रोमेन्टीक म्युजीक लावा.पाण्यात उतरल्यावर अचानक रिंग घालून तिला सरप्राईज द्या.

शाब्दिक कोड्यांचे गेम खेळा

जर तुमची गर्लफ्रेन्ड शब्दपंडीत असेल तर तिच्या सोबत शब्दांची कोडी खेळा.तिला मोठे प्रश्न विचारुच नका.स्रॅबलबोर्ड वर “विल यू मॅरी मी” अथवा “मॅरी मी” असे साधे प्रश्न लिहा व उत्तरासाठी “वाय” अथवा “एन” या दोनच शब्दांचे पर्याय उपलब्ध ठेवा.कदाचित तिला हा खेळ खुप आवडू शकतो.

प्रथम तुज पाहता

प्रपोज करण्यासाठी तुम्ही तिला जिथे पहिल्यांदा भेटला तिथे तिला घेऊन जा. ही जागा अगदी तुमच्या शाळेतील अथवा कॉलेजच्या क्लासरुम पासून एखाद्या मित्राच्या घरी अशी कोणताही असू शकते.त्या ठिकाणी तुमच्या मेमोरेबल आठवणींचे फोटो लावा व त्या प्रत्येक फोटोखाली तुमचा एक प्रश्न लिहा.ते पहात पुढे जाताना ती थोडी भावनीक होईल.या संधीचा फायदा घेत तिला जवळ ओढा व पटकन तिच्या बोटात रिंग सरकवा.

प्रेम डायरी

आत्तापर्यंत तुम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांचे फोटो व आठवणींची एखादी डायरी तिला भेट द्या.पहिल्या भेटीपासून आत्तापर्यत प्रत्येक वर्षी तुमच्या नात्यात झालेले सकारात्मक बदल त्यात नोंदवा.त्याचवेळी तुम्हाला तिच्या सोबत संपुर्ण आयुष्य घालवायला आवडेल हे सांगा व एका आकर्षक छोट्याश्या पाऊचमध्ये तिच्यासाठी आणलेली रिंग तिला द्या.

प्रेमाचा संदेश गिफ्ट करा

तिला आवडत्या आईसक्रीम मुळे तिचे मन कदाचित लगेच पाघळू शकते.यासाठी तुमच्या मनातील भावना तिच्या आवडत्या आईसक्रीमच्या बॉक्स वर कस्टमाईज करुन घ्या. त्यावर प्रेमसंदेश लिहून तुमच्या मनातील भाव व्यक्त करा तो .बॉक्स तिला भेट द्या व तिला तुम्हाला नाकारु शकणार नाही.

तिच्या सोबत वेळ घालवा

तुम्ही तिच्या सोबत अनेक वेळा फिरायला गेला असाल पण समुद्रकिनारी एक रोमेंन्टीक वॉक तुमच्या आयुष्याचा कायपालट करु शकतो.तिच्या सोबत समुद्रकिनारी तुम्हाला काही सुंदर क्षण घालवता येतील.तिला शंख-शिंपल्यांचा नेकलेस गिफ्ट करा किंवा अगदी साधेपणाने तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते सांगा.समुद्रकिना-यावरचा एखादा शंख किंवा शिंपल्यावर प्रेमाचा संदेश लिहून तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून भेट द्या.

Leave a Comment