उद्योगाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देणार – आ.जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर –
नगर शहरात विकासाचा अजेंडा घेऊन काम करत असताना शहरातील उद्योग व्यवसाय वाढावेत, यासाठी पोषक वातावरण निर्मितीवर आपण भर दिलेला आहे. त्यामुळे काही काळ उतरती कळा लागलेल्या नगर शहरातील उद्योग व्यवसायाला आता उभारी येऊ लागली आहे. 

उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहमदनगर मोबाइल असोसिएशनच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, उपाध्यक्ष गोरख पडोळे, संतोष बलदोटा, अजित पवार, अविनाश घुले, हिरालाल खुबचंदानी, मनोज बलदोटा, पंचम पडोळे, मनीष चोपडा, मारुती पवार, उमेश धोंडे, भुपेंद्र रासने, शुभम जगताप, सुदाम वांढेकर, अभिजित शहा, सुमित पितळे आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, शहरात अनेक तरुणांना व्यवसाय करताना विविध प्रकारच्या अडचणी येतात. त्या सोडवण्याचे काम आपण नेहमीच केलेले आहे.

आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज असून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या आणि सध्या व्यवसाय करत असलेल्या सर्वच युवकांच्या अडचणी सोडवल्या जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. 

गोरख पडोळे म्हणाले, आमदार जगताप यांनी मोबाईल व्यवसाय करणाऱ्या तरुणांना संघटित करून त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याचे तसेच अडीअडचणी सोडवण्याचे काम केलेले आहे. 
त्यामुळेच अहमदनगर मोबाइल असोसिएशनच्या वतीने त्यांना पाठिंबा दिला असून असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य जगताप यांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment