घोटाळ्यात नाव असलेल्यांनी जनाची नाही, मनाची तरी लाज धरावी… उदयनराजे भोसले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राशीन
घोटाळ्यात नाव आलेल्यांनी जनाची नाही, मनाची तरी लाज धरत निवडणुकीस उभे राहू नये. अशा निष्क्रिय लोकांच्या सानिध्यात नको, म्हणूनच आपण खासदारकीचा राजीनामा अवघ्या ४ महिन्यांतच दिला, असे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी राशीन येथे भाजपच्या प्रचारसभेत बोलताना सांगितले.

उदयनराजे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना १५ वर्षे कुकडीची काय अवस्था झाली हे आपल्याला माहीत आहे. नैतिकता म्हणून या लोकांनी निवडणुकीस उभेसुद्धा राहू नये. जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षानी केले. त्याद्वारे त्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली. प्रत्येक समाजाचा वापर फक्त राजकारणासाठीच केला. प्रत्येक निवडणुकीत मराठा आरक्षणाचे आश्वासन दिले, प्रत्यक्षात मात्र कधीच दिले नाही. लोकांच्या प्रश्नांची जाण असती, तर यांना आत्मक्लेश करण्याची गरज भासली नसती, असे म्हणत अजित पवारांवर त्यांनी टीका केली.
मंत्री राम शिंदे म्हणाले, समोरच्या धनाढ्य शक्तीला माझी जनशक्ती पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. गेल्या पाच वर्षांत आपण विविध कामे मार्गी लावली आणि पाच वर्षांत युवकांना रोजगार आणि महिलांसाठी उद्योग निर्माण करण्याचा मानस आहे. एमआयडीसीसाठी प्रयत्न करणार आहे.

Leave a Comment