लोकसभेप्रमाणेच आघाडीचे पानिपत होईल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : नगर तालुक्यातील बहुतांशी पाणी योजना शिवसेनेने आणल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार शेलार यांनी खोटे बोलून दिशाभूल करुन श्रेय लाटू नये. शिवसैनिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत.

मागील ५ वर्षात सत्तेच्या विरोधातील आमदार निवडून दिल्याने तालुक्याची पिछेहाट झाली. चुकीच्या माणसाला निवडून दिल्याने मागील ५ वर्षे जनतेने शिक्षा भोगली आहे.

असे टीकास्त्र शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. गाडे सर यांनी विरोधकांवर सोडले. लोकसभेप्रमाणे आघाडीचे विधानसभा निवडणुकीतही निश्चितपणे पानिपत होईल, नगर शहरासह जिल्ह्यातील बाराही जागा महायुती मोठ्या फरकाने जिंकेल असा दावा त्यांनी केला.

नगर तालुक्यात महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शिवसैनिकांनी कुठल्याही अमिषांना बळी पडू नये. ही निवडणूक ही पाचपुतेंची नसून शिवसैनिकांची आहे. नगर-श्रीगोंदा मतदार संघातील प्रत्येक शिवसैनिक हा शेवटपर्यंत प्रामाणिकपणे लढणार आहे.असेही प्रा.गाडे म्हणाले.

मागील वेळेस भाजप, शिवसेना वेगवेगळला लढल्यामुळे पाचपुते यांना मत विभागणीचा फटका बसला. विशेष म्हणजे टँकर, छावण्या,रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात केली. नगर तालुक्यासाठी कोट्यवधीचा निधी आनला.

यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे देखील बबनरावांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. त्यामुळे सर्व शिवसैनिक पाचपुते यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन प्रा.गाडे यांनी केले.

Leave a Comment