शहरात उशिरापर्यंत लागल्या होत्या रांगा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर – 

मताधिकार बजावण्यासाठी नगरकर सोमवारी मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. पावसाने अचानक हजेरी लावली, तरी मतदारांमध्ये चांगला उत्साह पहायला मिळाला. 

सायंकाळी पाचपर्यंत जिल्हाभरातील मतदानाचा टक्का ६२ पर्यंत पोहोचला होता, तर नगर शहरातील मतदानाचा टक्का ५२ वर होता. जिल्हाभरातील प्रतिसादाच्या तुलनेत नगर शहरात कमी प्रतिसाद मिळत असल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कार्यकर्ते सक्रीय झाले होते. ४ ऑक्टोबरला अर्ज दाखल केल्यानंतर छाननी, माघार या प्रक्रिया पार पडल्या. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज यासह विविध पक्षातील उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली होती. 

प्रचाराच्या तोफा दोन दिवस आधिच थंडावल्यानंतर जिल्हाभरातील वातावरण कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींनी ढवळून निघाले होते. राहुरी मतदारसंघात आमदार शिवाजी कर्डिले की प्राजक्त तनपुरे, कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार की, भाजपचे राम शिंदे, नगर शहरात शिवसेने अनिल राठोड की, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप अशा लक्षवेधी लढतीची चर्चा जिल्हाभर रंगली होती. 

प्रत्येकजण सोयीने एक्झिट पोल मांडण्याचा प्रयत्न करत होता. निकालाची टक्केवारी पाहता जिल्हाभरातील जागांमध्ये फारसा फेरबदल दिसणार नाही. तथापि, काही जागांवर परिवर्तन होणार हे मात्र, निश्चित आहे. नगर शहरात रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. 

सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्र परिसरातील नागरिकांना प्रवेश देण्यात आला. रामवाडी परिसरात मोठी गर्दी असल्याने पोलिसांनी गस्त वाढवून या भागाकडे लक्ष केंद्रीत केले होते.

Leave a Comment