चंद्रकांत पाटलांच्या त्या ऑफवर मनसेचे किशोर शिंदे म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मतदान केंद्रावरच प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांना भाजपा प्रवेशाची ऑफर दिली. 

अर्थात त्यांची ही ऑफर शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत धुडकावून लावली. या ‘ऑफर’ प्रकरणाची कोथरूड व शहरात सध्या जोरदार चर्चा झाली. 

कोथरूड विधानसभेचे भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनीही मयूर कॉलनीमधील जोग शाळेतील मतदान केंद्राला भेट दिली. त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड. किशोर शिंदे हेही तिथे आले होते. त्यानंतर दोघांची भेट होऊन चर्चा झाली. यावेळी पाटील यांनी शिंदे यांना भाजपामध्ये येण्याची ऑफर दिली. 

शिंदे यांनी क्षणाचाही विचार न करता ही ऑफर धुडकावली. याबाबत किशोर शिंदे म्हणाले, मतदान केंद्रावर भाजपा प्रवेशाची ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली. आधी मेधा कुलकर्णी व मुरलीधर मोहोळ यांच्याकडे लक्ष द्या, त्यांना पाठबळ द्या, असे मी म्हणालो. 

दरम्यान, भाजपाने कोथरूडमधून आमदार मेधा कुलकर्णी, भाजपाचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ हेही इच्छुक होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोथरूडची निवडणूक चुरशीची व चर्चेची झाली आहे.

Leave a Comment