२४० महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून सेक्स स्लेव्ह बनवत ब्लॅकमेल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ब्राझील :- एक दोन नव्हे तर तब्बल २४० महिलांचं लैंगिक शोषण केलेल्या नराधमाला दक्षिणपूर्व ब्राझीलमध्ये मध्ये अटक करण्यात आली आहे.

ह्या आरोपीने या सर्व महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांना सेक्स स्लेव्ह बनवत त्यांना ब्लॅकमेल केलं.

तसेच आरोपीने अज्ञात व्यक्तींसोबत या महिलांना शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. इतकेच नाही तर तो या महिलांना प्राण्यांसोबतही सेक्स करण्यास जबरदस्ती करत असे.

 आरोपीचं नाव रोनी स्केल्ब असं आहे. आऱोपी रोनी हा सेल्स प्रतिनिधी म्हणून काम करतो. तसेच एका चर्चमध्ये युथ ग्रुप लीडर सुद्धा आहे. पोलिसांनी सांगितले की, ३२ वर्षीय आरोपी रोनी स्केल्ब याने ब्राझीलमधील ११ राज्यांत चार वर्षांच्या कालावधील या महिलांचं लैंगिक शोषण केलं.

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने या सर्व महिलांसोबत फेक सोशल मीडिया अकाऊंट आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधला होता. आरोपी रोनी हा या महिलांना इंटिमेट व्हिडिओज आणि फोटोज मागवून त्यांना पैसे देत असे. 

महिलांकडून न्यूड फोटोज मिळाल्यावर आरोपी त्यांना बँकेत पैसे ट्रान्सफर केल्याच्या बनावट स्लिप पाठवत असे. यानंतर आरोपी रोनी हा त्या महिलांना ब्लॅकमेल करु लागला.

तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना हे फोटो, व्हिडिओ पाठवण्याचं सांगत आरोपी ब्लॅकमेल करत असे. एका पीडित महिलेने सांगितले की, रोनी दिवसातून २०हून अधिकवेळा अशी मागणी करत असे.

आरोपी रोनी याला ११ ऑक्टोबर रोजी राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन सर्व पीडित महिलांना सोडवलं आहे.

Leave a Comment