शिंदे शाहीला सुरुंग, रोहित पर्वाची पावरफुल ‘एन्ट्री’!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर – जिल्ह्यात जोरदार मुसंडी घेत दोन्ही काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले. भाजप – शिवसेनेला चारीमुंड्या चीत करत दोन्ही काँग्रेसने आपापले ‘गड’ पुन्हा। काबीज केले. जिल्ह्यात भाजपचे हेवीवेट मंत्री समजले जाणारे राम शिंदे यांच्या पराभवाने मोठा धक्का बसला आहे. शरद पवाराचे यांचे नातू रोहित पवार यांची जोरदार ‘ एन्ट्री’ झाली आहे. 

१२ – ० चा नारा देणारे राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वगळता उर्वरित सर्वच उमेदवार ‘गॅस’ वर राहिले. विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना चौकार ठोकण्यात सपशेल अपयश आले. येथे राष्ट्रवादीचे नीलेश लंके हे जायंट किलर ठरले.

अकोल्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या आमदार वैभव पिचड यांना सपाटून हार पत्कारावी लागली. डॉ. किरण लहामटे यांना भरभरून मतदान करत विजयाचा गुलाल त्यांच्या अंगावर फेकला.

संगमनेर व शिर्डी मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे अनुक्रमे बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील निवडून आले आहेत.

२५ वर्षांपासून आमदारकी भोगत असलेल्या आमदार शिवाजी कर्डिले यांना यंदा ‘ब्रेक’ मिळाला. राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली.

शेवगाव – पाथर्डीत पुन्हा मोनिकाताई राजळे निवडून आल्या आहेत. अॅड. प्रताप ढाकणे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले.

नेवाशातून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव करत शंकरराव गडाख यांच्या गळ्यात आमदारकी माळ पडली.

श्रीरामपुरात आमदार भाऊसाहेब कांबळे यांना यंदा मतदारांनी नाकारले. दोन्ही काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे हे विधानसभेत पोहोचले आहेत.

कोपरगावमधून आमदार स्नेहलता कोल्हे व पारंपारिक प्रतिस्पर्धी आशुतोष काळे यांच्यात काँटे की टक्कर सुरू आहे. स्नेहलता कोल्हे यांचा निसटता पराभव झाला आहे.

श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे उमेदवार घन:शाम शेलार व बबनराव पाचपुते यांच्यात सुरू आहे. शेलार यांनी पाचपुतेंना चांगलाच घाम फोडला होता अखेर पाचपुते यांचाही निसटता विजय झाला आहे. .

Leave a Comment