अहमदनगर जिल्ह्याने भाजप – सेनेच्या ‘ह्या’ सहा आमदारांना दाखविला घराचा रस्ता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :-  जिल्ह्यातील 12 ही विधानसभा मतदार संघाचे निकाल स्पष्ट झाले आहेत,नगर जिल्ह्यातून आलेले हे निकाल अत्यंत धक्कादायक असून ना.शिंदे, कर्डिले, औटी, पिचड, कोल्हे, मुरकुटे ह्या युतीच्या सहा आमदारांचा पराभव झाला असून नगर शहरातून माजी आमदार अनिल राठोड यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.

काम न करणार पार्सल अखेर कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जनतेने परत पाठवले आहे. यंदाच्या विधानसभेत कर्जत जामखेड हा मतदार संघ राज्यात चांगलाच चर्चेत आला. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी गत सहा महिन्यांपासून चांगलाच जम बसविला होता रोहित पवार यांनी हि पूर्ण निवडणूक पूर्णता विकासाच्या प्रश्नावर लढवली.अकोले विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे यांचा 57 हजार मतांनी दणदणीत विजय झाला असून राष्ट्रवादी सोडून भाजपात आलेले मधुकर पिचड यांचा मुलगा विद्यमान आमदार वैभव पिचड यांचा धक्कादायक पराभव झालं आहे.

कोपरगावात अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय झाला असून अवघ्या 847 मतांनी आशुतोष काळे विजयी झाले आहेत भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अनपेक्षित पराभव झाला अहमदनगर शहर मतदारसंघात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ११ हजार ११५ मतांनी विजयी झाले असून सलग दुसर्यांदा त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव केला.

अनिल राठोड यांची ही शेवटची निवडणूक होती.पारनेरमध्ये पंधरा वर्षानंतर परिवर्तन झाले आहे, राष्ट्रवादीचे निलेश लंके विजयी झाले असून पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना पराभवाचा धक्का बसला. 

नेवासे मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख यांचा 31 हजार मतांनी विजय झाला आहे,भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा दारुण पराभव झाला असून शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या माध्यमातून गडाखांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. गडाखांना राष्ट्रवादीने पाठींबा दिला होता.

राहुरीत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे 22 हजार मतांनी विजयी झाले असून भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डीले यांचा पराभव झाला असून आमदार शिवाजी कर्डिले ह्यांची सत्ता या निकालामुळे संपुष्टात आली आहे.

Leave a Comment