माजी आमदार औटींसह सुजित झावरेंवर दुसर्‍यांदा ओढवली नामुष्की !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर :- बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात विधानसभा उपाध्यक्ष ना.विजय औटी व सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अविश्वास ठराव दाखल केला होता.

परंतु सभापती गायकवाड यांनी विरोधी संचालक ताब्यात घेवून खेळी केली. तसेच काही संचालक गैरहजर राहिल्याने हा अविश्वास ठराव बारगळला आहे. त्यामुळे विधानसभा पाठोपाठ ना.विजय औटी व सुजित झावरे यांना हा धक्का मानला जात आहे.

सभापती गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे संचालक काशिनाथ दाते, अशोक कटारिया, युवराज पाटील यांच्यासह उपसभापती विलास झावरे, राष्ट्रवादीचे संचालक अरुण ठाणगे, राहुल जाधव,

गंगाराम बेलकर, राजेश भंडारी आदी संचालक आहेत. तर शिवाजी बेलकर, अण्णासाहेब बढे, संगीता कावरे,राजश्री शिंदे हे चार संचालक सभापती गायकवाड यांच्या बाजूने आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शुक्रवार दि.२५ ऑक्टोबरला विशेष सभा होणार असल्याने याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. परंतु सभापती गायकवाड हे दुसर्‍यांदा अविश्वास ठराव बारगळण्यात यशस्वी ठरले आहेत.

Leave a Comment