Lifestyle

हिवाळ्यात आरोग्यदायी राहायचं असेल तर हे 10 पदार्थ खाण्याचे विसरू नका…

हिवाळ्यात एरवी पचायला जड असलेले पदार्थ सेवन केले तरी ते पचायला सोपे जाते. कमी आहार घेणारी माणसे या दिवसांत अधिक जेवतात आणि ते अन्न चांगल्या रीतीने पचवितात.

थंडीत शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरते. यामुळे सतत भूक लागते. सतत भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो. म्हणूनच आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवे. तर पाहू या हिवाळ्यात कोणता आहार योग्य ठरतो ते…..

1) हिवाळ्यात दिवसातून दोनदा डाळ नक्की खात जा, तुम्हाला पाणी आणि पोषक तत्व, दोन्ही देतं.

2) गरम दुधात मध घालून प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीत दुधात सारखाऐवजी मध घालावा.

3) ग्रीन टीचे सेवनही थंडीत उपयुक्त ठरते. कारण ग्रीन टीमध्ये भरपूर अँटी ऍक्‍सिडंट्‌स असतात. यामुळे अनेक बॅक्‍टेरियांचा प्रभाव कमी होतो.

4) अंड्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासोबतच व्हिटामिन ए, बी 12, बी6, ई, इत्यादी मिळते. त्यासोबतच यात उपस्थित असलेले कॅल्शिअम, आयरन, पोटॅशिअम, सेलिनियम, आणि प्रोटीन्समुळे खूप फायदा होतो. 

5) थंडीत मशरूम आवश्यक खाल्लं पाहिजे, याच्या सेवनामुळे व्हिटामिन डी आणि सेलेनियम मिळते.

6) ड्रायफ्रूटसमध्ये व्हिटामिन ई, बी कॉम्प्लेक्स, ओमेगा 3 एस, मॅगनेशियम, कॉपर, फ्लोराइड, जिंक, कॅल्शिअम, सेलेनियम आणि हेल्दी प्रोटीन असतात. हे खाणं थंडीत खूप गरजेचं आहे

7) व्हिटामिन बी6, सी, फोलेट आणि फायबर युक्त बटाटा शरीराला उष्णता पोहचवतं.

8) भोपाळ्यात पोटॅशिअम, मॅग्निशिअम, फोलेट, फायबर आणि व्हिटामिन ए, बी 6, सी आणि के असतात.

9) रताळे हे फायदेशीर ठरू शकते कारण त्यात व्हिटामिन सी आणि ए, पोटॅशिअम, सोडिअम, कॅल्शिअम आणि फायबरचा चांगलं प्रमाण असतं.

10) थंडीच्या दिवसात फळं जरूर खा. जसं की, संत्र, द्राक्ष आणि सफरचंद इत्यादी. व्हिटामिन सी जास्त असल्यामुळे ते शरीरातली प्रतिकार शक्ती वाढवतात. 

या कारणामुळे लागते हिवाळ्यात जास्त भूक !

थंडीच्या मोसमात भूक जास्त लागते. बाहेरील थंडीचा परिणाम शरीराच्या अंतर्गत अवयवांवर होऊ नये, म्हणून त्वचेची सूक्ष्म छिद्रे आकुंचन पावतात. यामुळे शरीरातील उष्णता आत कोंडली जाते व ही उष्णता अधिक भूक लागण्याचे कारण ठरते.Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button