दारुड्या पतीकडून पत्नीला लोखंडी पाइपने मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर – दारू पिऊन आलेल्या पतीने घरातील सर्व कपडे जाळून टाकले. कपडे का जाळले, याचा जाब विचारला असता त्याने पत्नीला लोखंडी पाइपने मारहाण केली. 

ही घटना जाधव पेट्रोल पंपाजवळील साईराम सोसायटीत घडली. पत्नीच्या फिर्यादीवरून दिगंबर दत्तात्रय सोनवणे याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सुवर्णा दिगंबर सोनवणे (३२) या भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिगंबर दुपारच्या वेळी दारू पिऊन आला. घरातील सर्व कपडे जाळून टाकले. 

कपडे का जाळले? असे सुवर्णा यांनी विचारले असता दिगंबरने लोखंडी पाइपने मारहाण केली. भांडण सुरू असताना सुवर्णाच्या आई व भाऊ तेथे आले असता त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी त्याने दिली.

Leave a Comment