एकही शेतकरी वंचित राहाता कामा नये ! आ. तनपुरेंनी अधिकाऱ्यांना खडसावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी – नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करताना अधिकार्यांनी निव्वळ आकडेवारीचा खेळ दाखवु नये. प्रत्यक्ष कृती करुन दाखवा. उघड्या डोळ्याने न बघता शेतकऱ्याच्या शेतात जावुन प्रत्यक्ष पंचनामे करा. नगर तालुक्यातील एकही शेतकरी वंचित ठेवू नका. 

काढलेल्या पिकांचेही पंचनामे करा. एकही शेतकरी यापासुन वंचित राहाता काम नये. नगर येथिल शेतकर्यांच्या पिक नुकसान बैठकीत नगर, पाथर्डी, राहुरी मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. 

यावेळी बैठकीस नगरचे तहसिलदार उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे नायब तहसिलदार अभिजीत बारवकर, शिल्पा पाटील, नगर तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, नगर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी माधव देशमुख किशोर जगताप, आर. एम गोसावी, सी. एन. खाडे, व्हि. जे. राउत, टि. एम. तुपे, बी. एन. शेळके, आदि कृषी विभागासह महावितरणाचे आतार खान, के. बी. कोपनर, बालविकास अधिकारी, एस. व्हि. देशमुख, आर. एस. माळी आदि उपस्थित होते. 

आ. तनपुरे पुढे म्हणाले की, एकही शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे. प्रत्येक गावात पुन्हा जावुन नुकसानीचे चौकशी करण्याचा आदेश तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना या बैठकी दरम्यान दिला.

तसेच गेली दोन ते तीन वर्षांपासुन महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत आहे. या सरकारने जी मदत जाहिर केली. तीही तुटपंजी आहे. मात्र जी मदत जाहिर केली ती लवकरात लवकर शेतकऱ्याला मिळावी. 

तसेच काही ठिकाणी कृषी विभागाने पुन्हा जावुन पंचनामे करावी. यापासुन कोणीही शेतकरी वंचित राहु नये. शेतकरी तक्रार आमच्याकडे करत आहे. पण पुन्हा शेतकऱ्यांच्या तक्रारी येवु देवु नये, असेही आ. तनपुरे यांनी सांगितले. यावेळी नगर पंचायत समितीचे माजी बांधकाम सभापती रघुनाथ झिने, नंदकुमार गागरे, धिरज पानसंबळ आदि उपस्थित होते.

Leave a Comment