आदिवासी व धनगर बांधवांचे प्रश्न सोडवू :आ. निलेश लंके

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर :- तालुक्यातील ढवळपुरी व परिसरातील वाड्या- वस्त्यांवर राहणारे आदिवासी तसेच धनगरबांधवांसह इतर समाजाचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन आदमार नीलेंश लंके यांनी दिले.

ढवळपुरी (ता. पारनेर) येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कारप्रसंगी आ. लंके बोलत होते. आ. लंके पुढे म्हणाले, जनतेच्या या प्रेमातून उतराई होण्यासाठी या समाजातील बेरोजगार व महिलांचे विविध प्रश्न तसेच घरकुल योजना, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, जातीच्या दाखल्यांसाठी आता पारनेरला जाण्याची गरज नाही तर एक खिडकी योजनेंतर्गत हे सर्व प्रश्न जागेवरच सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात ढवळपुरी परिसरातील बेरोजगारी कमी करण्यासाठी या परिसरात मिनी एमआयडीसी सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी दुर्गादेवी दूध संस्थेचे संचालक सुखदेव चितळकर यांचेही भाषण झाले. याप्रसंगी खारवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने आ. लंके यांची पेढेतुला करण्यात आली.

या वेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले, दुर्गादेवी दूध शीतकरण केंद्राचे संचालक सुखदेव चितळकर, वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, बाळासाहेब भनगडे, अजित सांगळे, बबन राठोड, भाऊ ठोकळ, राजू चौधरी, दत्ता कोरडे,

संदीप वाघ, देविदास राठोड, गणेश दरेकर, संदीप भागवत, संदीप रोहोकले, शरद भोंडवे, चांद शेख, गोवर्धन रोहोकले, मंगेश आदमाने, राजू केदार, गणपत कुटे, अंजाबापू चौधरी, नंदू गावडे, राजू भुसारी, शिवा मिसाळ आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment