राष्ट्रपती राजवट लागू होणार म्हणजे नक्की काय ???

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. जर राष्ट्रवादीही सत्तास्थापनेसाठी बहुमत सिद्ध करु शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

आज आपण जाणून घेवू या राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे नेमकं काय, त्याचे सामान्य नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतात आणि महाराष्ट्रात कधी आणि का राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली? आणि त्याबद्दलची माहिती 

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

राज्य सरकारने घटनाबाह्य काम केलं, सरकारकडे बहुमत राहिलं नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली, निवडणुकांच्या निकालात कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, सरकार स्थापनेसाठी कोणताही पक्ष पुढे आला नाही, एखाद्या गटाने बंड केलं किंवा सरकारमधील दोन पक्षांची आघाडी संपुष्टात येऊन सरकार अल्पमतात गेलं, तर राष्ट्रपती राजवट लागू होते.

राष्ट्रपती राजवट आल्यावर कोणाकडे असतात अधिकार ?

राष्ट्रपती राजवट (President’s rule) ही भारत देशाच्या संविधानामधील कलम ३५२,३५६,३६० नुसार लागू केली जाऊ शकते. कलम ३५६ ह्यानुसार कोणतेही राज्य सरकार अल्पमतात आल्यास किंवा कामकाज चालवण्यास असमर्थ ठरल्यास ते बरखास्त करून त्या राज्याचा कारभार थेट केंद्र सरकारद्वारे चालवला जातो. राष्ट्रपती राजवटीदरम्यान त्या राज्याच्या राज्यपालाला बहुतेक घटनात्मक अधिकार असतात.

राष्ट्रपती राजवट झाल्यानंतर काय बदल होतो ?

  • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर राज्यातील कारभार थेट केंद्र सरकारच्या हाती येतो. मुख्यमंत्री आणि मंत्र‌िमंडळाऐवजी राज्यपाल दैनंदिन कारभार पाहतात. 
  • राष्ट्रपती राजवटीची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारची सर्व सत्ता (उच्च न्यायालयाचे कार्य सोडून) राष्ट्रपतींच्या हाती जाते. राष्ट्रपती सामान्यपणे ही सत्ता राज्यपालांकडे सोपवतात.
  •  बहुतांश वेळा राज्याचे शासन राष्ट्रापतींच्या वतीने राज्यपाल चालवतात. राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने हे कार्य पार पाडतात.
  • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यविधिमंडळाची कार्ये संसदेकडे सोपली जातात. तसेच राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन कोणत्याही अधिकाऱ्यांना करावाई करण्यास सांगू शकतात.

भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागली होती राष्ट्रपती राजवट?

भारतात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट पंजाबमध्ये १९५१ मध्ये लागू केली होती. आजवर भारतामध्ये १२६ वेळा राष्ट्रपती राजवटीचा वापर करण्यात आला आहे.

इशान्येतील राज्य मणिपूर आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे १० राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे तर छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली नाही. 

महाराष्ट्रात किती वेळा लागू झाली राष्ट्रपती राजवट ?

  • महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा १९८० साली शरद पवारांचे पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार बर्खास्त करून १७ फेब्रुवारी १९८० रोजी राष्ट्रपती राजवट लागू झाली, आणि ती ९ जून १९८० ला काढण्यात आली.
  • २०१४ मध्येही महाराष्ट्र राष्ट्रपतीखाली गेलं. ही राष्ट्रपती राजवट ३२ दिवसांसाठी होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळलं होतं व त्यानंतर २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ यादरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

Leave a Comment