दर्शनासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग करत दमदाटी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
राहुरी :- दर्शनासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात घडली याबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील टाकळीमिया परिसरात असलेल्या एका दर्याच्या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरातील एक विवाहित तरुणी दर्शनासाठी गेली असता ११ च्या सुमारास सदर विवाहित तरुणी तेथे असताना
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील आरोपी बाळासाहेब लक्ष्मण धनवटे तेथे आला व सदर तरुणीचा हात धरुन तिला जवळ ओढून तिच्याबरोबर फोटो काढून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला व तिला दमदाटी केली.
याप्रकरणी विवाहित तरुणीने राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी बाळासाहेब लक्ष्मण धनवटे, रा. उक्कलगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. सपोनि राक्षे हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment