मोदीनॉमिक्समुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालीय !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
दिल्ली : खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य करत मोदीनॉमिक्समुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा आरोप केला. मोदींच्या अर्थशास्त्रामुळे देशाचे एवढे नुकसान झाले आहे की, आता सरकारला आपलाच अहवाल लपवून ठेवावा लागत आहे, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.
 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या या अहवालानुसार २०११-१२ या साली देशात प्रत्येक व्यक्तीकडून करण्यात येणारा सरासरी मासिक खर्च १५०१ रुपये होता. हा खर्च २०१७-१८ या सालात कमी होऊन १४४६ रुपये झाला आहे. ही सुमारे ३.७ टक्क्यांची घट आहे.
या अहवालाचा दाखला देत राहुल यांनी मोदी सरकारवर टीका केली. मोदीनॉमिक्समुळे अर्थव्यवस्थेचे एवढे नुकसान केले की, आता सरकारला आपलाच अहवाल लपवावा लागत आहे, असे ट्विट राहुल गांधींनी केले.
काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनीही या रिपोर्टचा दाखला देत नोटबंदी आणि घाई गडबडीत लागू केलेल्या जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा दावा केला.

Leave a Comment