सलग चौथ्या दिवशीही शिर्डी विमानसेवा ठप्प!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काेपरगाव : ढगाळ वातावरणामुळे अपेक्षित दृश्यमानता नसल्याने गेल्या चार दिवसांपासून शिर्डी विमानतळावरील विमानांचे उड्डाण बंदच आहे. 

त्यामुळे येणारी ५६ व जाणारी ५६ अशा ११२ विमानांची सेवा बंदच राहिली. त्यामुळे देश-विदेशातून साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडचण झाली आहे.

साेमवारीही ही सेवा सुरू हाेईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त हाेत आहे. विमानतळ प्रशासनाकडूनही त्याबाबत सांगण्यात आले नाही.

गुरुवारपासून शिर्डीतील विमानसेवा ठप्प झाल्यामुळे काही विमाने औरंगाबादेत उतरवण्यात आली हाेती. त्यानंतरही रविवारपर्यंत दृश्यमानतेची अडचण शिर्डी विमानतळावर कायम राहिली. त्यामुळे चाैथ्या दिवशीही सेवा ठप्पच हाेती.

Leave a Comment