माजीमंत्री बबनराव पाचपुतेच ठरविणार देवेंद्र फडणवीस – अजित पवारांचे भवितव्य !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- कालची सकाळ राजकीय भूकंपानेच उजाडली. अजित पवार यांनी बंडखोरी करत थेट भाजपशी हातमिळवणी केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला.या बंडखोरीची बक्षिसी म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे. मात्र याच बंडखोरीमुळे अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विधानसभेत २८८ जागा असून फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. त्यामुळे विधानसभेतच नियम आणि तांत्रिकतेचा कस लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस कायदेशीररीत्या फुटायची तर अजित पवारांसोबत 36 आमदारांनी बाहेर पडायला हवं.

तितके आमदार सोबत नसतील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारविरोधात पक्षादेश जारी केला, तर त्यांना तो पाळावा तरी लागेल किंवा आमदारकी रद्द करणाऱ्या पक्षांतरविरोधी कारवाईला तोंड तरी द्यावं लागेल. यात उरतो मार्ग कर्नाटकातील ऑपेरशन कमळचा, बहुमताची संख्याच कमी करण्यासाठी राजीनामे द्यायला लावण्याचा. हा राजकीयदृष्ट्या जुगार आहे. तो लावायला किती जण तयार होतील, हा प्रश्‍न असेल.

या दरम्यान विधानसभेत अध्यक्ष काय भूमिका घेतात, याला महत्त्व आहे आणि अध्यक्ष निवडीतच कदाचित फडणवीस सरकारच्या स्थैर्याची परीक्षा होईल. दरम्यान या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे, आता अध्यक्ष ही भाजपचेच असण्याची शक्यता आहे स्वाभाविकपणे विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असू शकतो.

अजित पवार गटनेते होते आणि त्यांचाच व्हीप चालेल अशी भूमिका घेतली तर तो निर्णय भाजप सरकारच्या भवितव्यास फायद्याचा ठरेल फडणवीस सरकार बहुमताचा आकडा पार करेल, अजित पवार व देवेंद्र फडणवीस  यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा पाठिंबा आहे कि नाही हे सिद्ध्द विधानसभेतच कराव लागेल आणि या सर्वात विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

विधानसभेत निवडून आलेला सर्वात सिनियर आमदार विधानसभा अध्यक्ष होत असतो या विधानसभेत सर्वात सिनियर आमदार बाळासाहेब थोरात असून ते कॉंग्रेसचे आहेत त्यामुळे त्यांना ते पद मिळण्याची शक्यता नाही  थोरातांनंतर भाजपचे बबनराव पाचपुते असून विधानसभा अध्यक्षपद माजीमंत्री पाचपुते यांनाच मिळण्याची शक्यता आहे ते भाजपचेच असल्याने या सरकार बाबत निर्णय त्यांच्याच कोर्टात जाणार आहे त्यामुळे पाचपुतेच ठरवतील हे सरकार टिकेल कि नाही.

Leave a Comment