…म्हणून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या नाटकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र पदभार स्विकारला नाही. 

अजित पवार हे सुद्धा विधीमंडळात पोहोचले होते, परंतु त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नाही. ते चर्चगेटमधील आपल्या घरी रवाना झाले आहेत.

आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. विधीमंडळात अजित पवारांनी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली.

परंतु विधीमंडळात पोहोचून सुद्धा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली तसेच त्यांचा मन वळवण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. बैठकीत नेमकं काय झाले याबाबत भुजबळ यांनी सांगण्यास नकार दिला.

Leave a Comment