आनंदाची बातमी : नगरच्या उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लागणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- शहरातील प्रलंबित उड्डाणपुलाच्या बांधकामसाठी आवश्यक असलेली भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील २३ जणांना नोटिसा बजावल्या होत्या.

यापैकी बहुतांश जणांनी आम्ही आमची जागा देण्यास तयार असल्याची संमती जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे त्यामुळे उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

उड्डाणपुलासाठी लष्कराच्या हद्दीतील जागा संपादनाचा विषय संरक्षण मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला आहे. आता, या खात्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ केव्हा मिळते, याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे.

जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची एकत्रित बैठक घेऊन भूसंपादनाचा विषय मार्गी लागण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे.

पुणे रस्त्यावरील सक्कर चौकापासून ते औरंगाबाद रस्त्यावरील जीपीओ चौकापर्यंत ३ किलोमीटर अंतरात हा पूल प्रस्तावित आहे. पण या दोन्ही ठिकाणी वाहने उतरण्याची सुविधा करावी लागणार आहे.

दुसरीकडे उड्डाणपुलाची लांबी व रुंदी यामध्ये कमी-जास्त होईल का, यासंदर्भातसुद्धा आता चर्चा सुरू झाल्या आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सक्कर चौकाजवळून या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Entertainment News Updates 

 

Leave a Comment