पाण्याची समस्या घेऊन स्वीडनचे लोक आले राळेगणसिद्धीच्या वारीला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
पारनेर :- पाण्याची समस्या भारताबरोबरच संपूर्ण जगभरात पाहायला मिळते. अशात जगभरातील अनेक देश पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. परंतु याच दरम्यान भारतात एक असे गाव आहे ज्याच्यावर संपूर्ण भारत गर्व करू शकतो. या गावाची पाणी वाचवण्याची पद्धती शिकण्यासाठी दुसऱ्या देशातून लोक येत आहेत. 
ते गाव दुसरे तिसरे कोनतेही नसून महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी हे आहे. राळेगण सिद्धी हे थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील जलव्यवस्थापन हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम समजले जाते.
त्याचे झाले असे की बाल्टिक समुद्र परिसरात उन्हाळ्याच्या दिवसात पाणी खूप परिश्रमाने मिळते. असे मानले जाते की पाण्याच्या कमतरतेचे कारण स्ट्रॉसरेट येथील मातीचा पातळ थर आहे. त्यामुळे पावसाचे पाणी येथील जमीन शोषून घेऊ शकत नाही.
अशातच आईविएल  पर्यावरण अनुसंधान च्या विशेषज्ञ रूपाली देशमुख यांनी जलसंचयसाठी भारतातील गावांचा अभ्यास करण्याचे ठरवले. अशातच त्यांची नजर महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी या गावावर पडली.
त्यांच्या निरीक्षणातून त्यांना असे दिसून आले की राळेगण सिद्धी आणि स्वीडन येथील परिस्थिती सारखीच आहे. त्यानंतर त्यांनी राळेगण-सिद्धी वर संशोधन केले. त्यांनी येथील चेक डॅम आणि तलाव अशा परंपरागत जलसंचयाच्या साधनांचा अभ्यास केला.
ज्यांचा स्वीडनमध्ये कधीही उपयोग झाला नव्हता. स्वीडनमध्ये या पद्धतीचा वापर करण्याचा निर्धार आता रूपाली देशमुख यांनी केला आहे.

Leave a Comment