अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची चिन्हे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वृत्तसंस्था :- राज्याच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपद यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहण्याची तसेच उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बंड फसल्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा करत हे पद राष्ट्रवादीलाच मिळणार असा दावा केला आहे.

उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहील. विधानसभा अध्यक्षांच्या नावावर दिल्लीत काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

Leave a Comment