वेबसाईटवर खोटी माहिती देऊन फसवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : हॉटसअप, मेल आयडीवर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्डची आवश्यकता असल्याची खोटी माहिती देवुन,

फसवणूक केल्याची ब्रजेश प्रेमशंकर तिवारी यांनी हरीषचंद्र गोपाळ बेलवले याच्याविरूध्द जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, बेलवले याने फिर्यादी तिवारी यांच्या मेलआयडी वर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्ड पाहिजे अशी खोटी जाहिरात खुलेखा डॉट कॉम या ऑनलाईन वेबसाईटवर टाकून फायनल व्यवहार करण्यासाठी जामखेड येथील हॉटेल किनारा येथे बोलावले.

मात्र आरोपीने यातील सर्व माहिती ही खोटी व बनावट तयार करून ॲडव्हासपोटी २० हजार रूपयांची मागणी केल्याची तक्रार तिवारी यांनी जामखेड पोलिसांत दिली.यावरून जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment