चोरीचे वीज कनेक्शन तोडल्याने वायरमनला मारहाण 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर:  बेकायदेशीरपणे घेतलेले वीज कनेक्शन तोडल्याचा राग आल्याने दोघांनी वायरमनला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना बोल्हेगाव येथील भारत बेकरीच्या मागे शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुनील नारायण तांबे व नीरज सुनील तांबे अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनी घरात चोरून वीज कनेक्शन घेतले होते. महावितरणचे कर्मचारी सचिन बाळासाहेब बोरुडे हे रवी बाळासाहेब कराळे यांच्यासह तेथे गेले.

त्यांनी चोरीचे वीज कनेक्शन तोडल्याचा राग आल्याने तांबे यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मुंडे करत आहेत.

Leave a Comment