राहुरी भाजपचा तालुकाध्यक्ष कोण होणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
राहुरी : राहुरी तालुका भाजपाची यावेळच्या अध्यक्ष निवडीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहिले जात आहे. कारण सन २००४ पासून राहुरी विधानसभा मतदार संघात पक्षाचे आमदार होते. यावेळी माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव झाल्याने आता तालुकाध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार,याबाबत उत्सुकता आहे. 
राहुरी तालुका भाजपाचे विद्यमान अध्यक्ष विक्रम तांबे पदावर असताना २००९ मध्ये शिवाजीराव कर्डिले विजयी ठरले होते. सध्या तेच अध्यक्ष आहेत. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात तांबे यांनी सहभाग घेऊन पक्षाचे काम केले. त्यांच्या निवडीच्या वेळी अनेक मोठमोठी नावे चर्चेत असताना अचानक त्यांचे नाव जाहीर झाल्याने सामान्य निष्ठावान कार्यकत्र्याला न्याय मिळाल्याची भावना इतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.
माजी अध्यक्ष नानासाहेब गागरे यांनी त्यांच्या निवडीनंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा, कृ षी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा सहकारी बँक आदी निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाधानकारक काम केले होते. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. तांबे व गागरे पुन्हा इच्छुक आहेत. माजी आ.शिवाजीराव कर्डिले, मा.आ.चंद्रशेखर कदम यांच्याशी सलोख्याचे संबंध असलेल्या कार्यकत्र्याला संधी मिळू शकते,अशी चर्चा आहे.
 तालुक्यातील प्रत्येक गावात चांगला संपर्क, पदाला न्याय देण्याची क्षमता, पक्ष संघटना वाढविण्यासाठी व भविष्यात सत्तेच्या विरोधात लढा देऊ शकेल अशा व्यक्तीची पक्षाला गरज असणार आहे. कारण तालुक्यात आमदारकीबरोबरच आता राज्यातही सत्ता ही नाही,या गोष्टींचा नक्कीच विचार होईल असे दिसते.
अध्यक्षपदासाठी देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, आदर्श गाव गणेगावचे सरपंच अमोल भनगडे, विजय बानकर, शहराध्यक्ष योगेश देशमुख, मा. शहराध्यक्ष आण्णासाहेब शेटे, नगरसेवक शहाजी जाधव, मा.नगरसेवक सुभाष वराळे, पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, माजी अध्यक्ष साहेबराव म्हसे, राजेंद्र गोपाळे, सुकुमार पवार, जब्बार पठाण, बबन कोळसे, शहाजी कदम आदी नावांची चर्चा होत आहे.
भाजपाचे निष्ठावान म्हणून सुखदेव ताठे, प्रकाश पारख, चांगदेव भोंगळ , बापूसाहेब वराळे आदी नावेही अंतिम टप्प्यात पुढे येऊ शकतात. यावेळी माजी मंत्री आ.राधाकृ ष्ण विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याने ऐनवेळी विखे समर्थक नावाचा देखील विचार होऊ शकतो.
यामध्ये डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे, मा.नगरसेवक राजेंद्र उंडे, संचालक रविंद्र म्हसे आदी नावे पुढे येऊ शकतात. डिसेंबर अखेरीस ही निवड होणार असल्याची चर्चा असल्याने अध्यक्षपद मिळविण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Leave a Comment