शाही विवाह सोहळ्यातून 17 तोळे सोने लंपास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिर्डी – राहाता शहरात एका शाही विवाह सोहळ्यातून चोरट्याने 17 तोळे सोने आणि दहा हजार रुपये रोख असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

ही घटना  सीसीटीव्हीत कैद झाला आहे. श्रीरामपूर येथील उद्योजक मूळे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळा, राहाता येथील कुंदन लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

या विवाह सोहळ्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. मंजुषा कुलकर्णी या देखील आलेल्या होत्या. कुलकर्णी या विवाहस्थळी खुर्चीवर बसलेल्या असताना, त्यांच्या बहीनीने ग्रे रंगाची पर्स त्यांच्याकडे सांभाळन्यासाठी दिली होती.

या पर्समध्ये 17 तोळे सोन्यासह दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल होता. कुलकर्णी यांनी ती पर्स शेजारील मोकळ्या खुर्चीवर ठेवली.

नातेवाईकांशी बोलत असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ही पर्स लांबवली. या प्रकरणी राहाता पोलीसांनी अज्ञात चोरा विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉन्स मधील सी सी टीव्हीचे फुटेच मध्ये  एक संशीयीत हातात पर्स घेऊन जाताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राहाता पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment