आ. डाॅ. लहामटेंच्या बैठकीकडे नगराध्यक्ष उपाध्यक्षांसह नगरसेवकांनी फिरवली पाठ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अकोले – आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी राज्य सरकारकडून प्रलंबित योजनांना निधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने बैठक बोलावली होती. बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप प्रशासनाकडून प्राप्त होऊनही बैठकीला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी पाठ फिरवली.

परंतु, भाजपत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड पिता-पुत्रांशी नाळ जोडलेल्या नगरपंंचायतच्या या पदाधिकारी व नगरसेवकांनी आमदार डाॅ. लहामटे यांच्या बैठकीला गैरहजर राहणेच पसंत केले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सचिनकुमार पटेल यांच्याकडून आमदार डाॅ. लहामटे यांनी बैठक बैठकीला राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुभद्रा संपत नाईकवाडी, स्वाती संदीप शेणकर, निशीगंधा निवृत्ती नाईकवाडी व शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद मंडलिक यांच्या व्यतिरिक्त कोणीही हजर राहिले नाहीत.

विशेष म्हणजे १७ सदस्य संख्या असलेल्या या नगरपंंचायतीत काँग्रेसचे तीन, भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी एक व अपक्ष दोन नगरसेवक वगळता अन्य सर्व सदस्य राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आहेत.

ही बाब लक्षात घेता, अकोले शहराच्या विकासासाठी आमदार डाॅ. लहामटे यांच्या स्वागतासाठी सर्वांनी उपस्थित राहणे गरज होते. पण बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप प्रशासनाकडून प्राप्त होऊनही ‘त्यांनी’ पिचड पिता-पुत्रांमुळे बैठकीला गैरहजर राहणे पसंत केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, अकोले नगरपंंचायतच्या विकास कामांसाठी शासनाचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आमदार डाॅ. लहामटेंकडे नगरसेवकांनी मागणी केली.

Leave a Comment