अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वृत्तसंस्था :- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे ती गर्भवती झाल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील नगर कोतवाली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

कोतवाली परिसरात एका व्यक्तीने २६ नोव्हेंबर रोजी केलेल्या तक्रारीत बालेंद्र राजपूत याने १६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला,

त्यामुळे ती गर्भवती झाली असल्याचा आरोप केला असल्याची माहिती महोबाचे पोलीस अधीक्षक मणिलाल पाटीदार यांनी गुरुवारी दिली.

पोलिसांच्या तुकडीने बुधवारी टाकलेल्या धाडीत आरोपीला त्याच्या अड्ड्यावरून अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, त्यावेळी अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांची गर्भवती होती.

Leave a Comment