अहमदनगर जिल्ह्यातील शेती – बाजारभाव 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर: बाजार समितीत शुक्रवार (दि. १३ रोजी) मेथीच्या भाजीची मोठी आवक झाल्याने भाव चांगलेच पडले होते. प्रतिजुडीला २ ते ४ चार रुपये भाव मिळाला. त्याच बरोबर कोथिंबिरीची मोठी आवक झाल्याने प्रतिजुडीला २ ते ४ रुपये भाव मिळाला.

अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने नोव्हेंबर महिन्यात मेथी व कोथिंबीरने चांगलाचा भाव खाल्ला होता. मेथी प्रतिजुडीला २० ते ३० रुपयांपर्यंत भाव गेला होता. तर कोथिंबीर बाजारात मिळणे अशक्य झाले होते.

मात्र रब्बीच्या पेरणीबरोबर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कोथिंबीर व मेथीची लागवड केली होती. या दोन्ही भाज्या कमी कालावधीत निघत असल्याने एकाच वेळी या भाज्या काढणीला आल्याने शुक्रवारी बाजारात या भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शेतकरी चांगलाच नाराज झाला.

नगर बाजार समितीत शेजारच्या गावांसह जिल्हा व परजिल्ह्यांतूनही भाज्यांची मोठी आवक होते. त्याचाच परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव:

पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो ५०० – १२००, वांगी १५०० – ३०००, फ्लावर २५०० – ४५००, कोबी ५०० – २०००, काकडी १००० – १५००, गवार ३००० – ६०००, घोसाळे १००० – २०००, दोडका १००० – ३०००, कारले १५०० – २५००, भेंडी १००० – ३०००, वाल १००० – १५००, घेवडा १००० – २०००,

तोंडुळे १००० – २०००, बटाटे ८०० – १२००, लसूण ८००० – १८०००, हिरवी मिरची ८०० – २०००, शेवगा ४००० – ६०००, डिंगरी १००० – ३०००,भू.शेंग ४०००-६०००, लिंबू ५०० – १०००, आद्रक ४००० – ५०००, गाजर २००० – २२००, दु.भोपळा ५०० – १०००, मका कणसे ५०० – ८००, शिमला मिरची १००० – २००० मेथी २०० – ४००,

कोथिंबीर ३०० – ४००, पालक ३०० – ८००, करडी भाजी , शेपू भाजी ५०० – ६००, चवळी १००० – २०००, चुका,बीट ४० – ५०, वाटाणा १५०० – ३०००, डांगर ५०० – ८००, मुळे ४०० – ५००.

धान्य : गावरान ज्वारी २३२१ -३६००, बाजरी १६५१ – २२००, मुग ६००० – ५६००, हरभरा, उडीद ५०००-६७००, मिरची ४६५५ – १७४६०, गहू २२२५ -, २२२५, सोयाबिन २५०० – ४०५१, मका १७६०-१८५१, गुळ डाग २८००-३६००.

Leave a Comment