शिर्डी शहर व मंदिर परिसरात थुंकूम घाण करू नका नगरसेविकेने केले जनतेस आवाहन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिर्डी : साईभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पिंपळवाडी रोडलगतच्या फुटपाथ कडेला गुटखा खाऊन थुंकलेले चित्र शहर व भाविकांना दृष्टीने अतिशय चुकीची बाब आहे. शहरात तसेच मंदिर परिसरातील रस्त्यांवर अशा प्रकारे थुंकून शहराच्या स्वच्छतेस बाधा आणू नये, असे आवाहन शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते यांनी केले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्षा कोते यांनी म्हटले आहे की, शिर्डी नगरपंचायतच्या वतीने शिर्डी शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सर्वोतोपरीपर्यंत केले जात आहे. शिर्डी शहरात स्वच्छतेचा यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे. देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपंचायत प्रयत्नशिल आहेत.

शिर्डी शहर कचरामुक्त करण्यात यश आले आहे. आता शहराच्या सौदर्यांत भर पडावी यासाठी सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहराच्या विकास व कायापालट केला जात आहे.

सर्वत्र शहरात स्वच्छता राखण्याबरोबरच प्रत्येक प्रभागात घंटागाडी पाठवून कचरा संकलीत केला जात आहे. वेळच्या वेळी डास प्रतिबंधक फवारणी, फॉगिंग मशिनच्या सहाय्याने फवारणी केली जाते. शहरातील झाडांची निगा राखली जात असून ग्रीन शिर्डी क्लीन शिर्डी केली जात आहे.

एकीकडे नगरपंचायत पदाधिकारी व प्रशासन शहर स्वच्छ करत असताना दुसरीकडे गुटखा खाणारे रस्त्याच्या कडेला किंवा कोठेही थुंकून शहराच्या स्वच्छतेस बाधा आणत आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात अशा प्रकारे त्यांना रंगलेल्या पिचकाऱ्यांचे दर्शन घडणे चांगले नाही.

भाविक पायात, चप्पल बुट न घालता मंदिराकडे पायी जात असतात. आपल्या गावाचे पावित्र्य आपण जपले पाहिजे. मंदिर परिसर किंवा शहरात अन्यत्र अशा प्रकारे थुंकू नये, असे आवाहन नगराध्यक्षा कोते यांनी केले आहे.

Leave a Comment