श्रीगोंद्यातील या सहकारी सेवा संस्थेत झाला तब्बल सव्वा दोन कोटींचा अपहार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 श्रीगोंदा : तालुक्यातील पेडगाव येथील पेडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत दि.१/०४/१८ ते ३१/३/१९ या दरम्यान २ कोटी २३ लाख ४१ हजार ६९९ रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. सदर अपहार व संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी द्वारकानाथ जनार्दन राजहंस यांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून तत्कालिन सचिव व एका कर्मचाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष हौसराव दळवी, रा.अजनुज, ईश्वर पंढरीनाथ गोधडे असे त्या दोघांची नावे असून शनिवार दि.१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारी संस्थेत एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी द्वारकानाथ राजहंस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वरील दोघेही पेडगाव सहकारी संस्थेत सचिव व कर्मचारी म्हणून नोकरीस असताना,

त्यांनी वरील कालावधीत त्यांच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून संगनमताने संस्थेच्या मालकीच्या २ कोटी २३ लाख ४१ हजार ६९९ रूपये रकमेचा अपहार करून फौजदारी पात्र न्यासभंग करून संस्थचे सभासद, संचालक, बँक, लेखापरीक्षक यांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे. या फिर्यादीवरून सचिव व कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment