आईचा मार वाचविण्यासाठी पाचवीत शिकणाऱ्या या मुलाने जे काही केलं ते वाचून तुम्हालाही धक्काच बसेल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- शाळेतून घरी आल्यावर दारासमोरील ओट्यावर बसलाे होतो. तेवढ्यात लाल रंगाची ओमनी आली. तिघांनी मला तू हमारे साथ गाडी में नही आया, तो तेरे अब्बाको मार देंगे अशी धमकी दिली. मी गाडीत बसलो नाही. मी सायकलवर गाडीच्या मागे गेलो, तेव्हा मला गाडीत बसवून अपहरण केले. नंतर सोडून दिले, असे सांगत पाचवीत शिकणाऱ्या एका मुलाने गुरुवारी पालक, पोलिस, शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकांना चांगलेच कामाला लावले.

अपहरणाची हकीकत मुलाने आईला सांगितल्यावर घरच्यांनी पोलिस ठाणे गाठले. शैक्षणिक संस्था व पालकांमध्ये खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे व उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी तपास सुरू केला. खूप शोध घेतला, तरी धागेदोरे मिळाले नाहीत.

पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला खोदून खोदून विचारले तेव्हा तो असंबद्ध माहिती देऊ लागला. तो खोटी माहिती देतोय हे पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही. पत्रकारांशी बोलताना पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी सांगितले, आम्ही खात्री करण्यासाठी उपनिरीक्षक दीपक ढोमणे व स्टाफला पाठवले.

त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केली असता दिवसभर एकही लाल रंगाची गाडी आली नाही, असे त्यांनी खात्रीशीर सांगितले. त्या भागातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता हा मुलगा एकटाच सायकल चालवत संगमनेर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ जाताना दिसला.

वडिलांनी विचारपूस केली असता मुलाने सांगितले, सकाळी मी ट्युशनला गेलो नाही, तसेच लहान बहिणीला सांभाळले नाही म्हणून आईने मला मारले. यामुळे मी सायकलवर रागाच्या भरात गेलो. कुठे गेलो हे आई विचारेल म्हणून मी अपहरणाचा बनाव केला.

या घटनेत काहीही तथ्य आढळले नाही. विद्यार्थ्याने सिनेमा स्टाईल बनाव रचून खोटी माहिती देऊन दिशाभूल केले. मुलाच्या वडिलांनी जबाब दिला असून त्यांची कोणाही विरुद्ध तक्रार नाही. पालकांनी याबाबत दक्षता घ्यावी – अरविंद जोंधळे, पोलिस निरीक्षक.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment