2020 मध्ये गाव तिथे काँग्रेस अभियान राबविणार : आमदार डॉ. सुधीर तांबे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- अहमदनगर जिल्हा काँग्रेस व सर्व फ्रंटल संघटना यांच्या वतीने सन 2020 हे अहमदनगर जिल्ह्यात संघटना बांधण्याचे वर्ष म्हणून विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा काँग्रेसच्या वतीने 1 जानेवारी 2020 पासून गाव तेथे काँग्रेस हे अभियान राबविण्यात येणार असून वर्षभरात जिल्ह्यात सुमारे प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करण्याचा संकल्प जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला असल्याचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तालुका काँग्रेसच्या अध्यक्षांच्या बैठकीत आ. डॉ. तांबे बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके हे अध्यक्षस्थानी होते तर बैठकीसाठी आ. लहू कानडे , अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दीप चव्हाण, जि प सदस्य प्रताप शेळके, माजी जि.प सदस्य व समन्वयक ज्ञानदेव वाफारे, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के , जामखेड तालुकाअध्यक्ष शहाजीराजे भोसले , कर्जत तालुकाअध्यक्ष किरण पाटील, पारनेर तालुका अध्यक्ष संभाजी राहेकले, पाथर्डी तालुकाअध्यक्ष नसीर शेख, राहुरी तालुकाअध्यक्ष बाबासाहेब आढाव , श्रीगोंदा तालुकाध्यक्ष दीपक भोसले, श्रीरामपूर तालुकाअध्यक्ष अरुण पाटील नाईक,राहता तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे,कोपरगाव तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शेवगाव तालुका अध्यक्ष अमोल फडके, प्रवीण घुले ,अ‍ॅड. कैलास शेवाळे,प्रवीण घुले, किशोर तपकिर, पोपट खोसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील पिढीतील जिल्ह्यातील अनेकांनी या पक्षाचे नेतृत्व केले आहेत. भाजपा हे भूलथापा देऊन राजकारण करत आहे. जनतेला त्यांच्यावर विश्वास राहिला नाही भाजपा काळातच देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे मात्र सरकार त्यावर उपाययोजना करण्याऐवजी धार्मिक मुद्द्यांच्या आधारावर करत आहे. जनतेला आता शाश्वत विकास हवा असून तो काँग्रेसचा विचारच करू शकतो काँग्रेसची कायम ग्रामीण भागाशी नाळ जोडली आहे.

महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात व जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा सक्षमपणे उभी राहणार असून जिल्ह्यात गाव निहाय शाखा सुरू करण्यात येणार आहे. तिथे नव्याने कार्यकारणी होणार असून तरुणांना संधी मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

आ. लहू कानडे बोलतांना म्हणाले कि, काँग्रेसच पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे कि जो सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचे काम करत आहे, असे कोणते क्षेत्र नाही जिथे काँग्रेसनी योगदान दिले नाही. जिल्ह्यात गाव तिथे काँग्रेस हि संकल्पना राबविताना काँग्रेस पक्ष मजबूत हा जिल्ह्यात अधिक ताकदीने समोर येईल यादृष्टीने आपण सर्वानी मिळून काम केले पाहिजे व यासाठी मी देखील सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या काही अडीअडचणी असतील शासकीय कार्यालयातील कामे वा सरकारी दवाखान्यातील ज्या काही अडचणी असतील त्या मार्गी लावण्याकरिता पक्ष कार्यालयात प्रत्येक पंधरवड्याला मी उपस्थित असणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हण यांचीही यावेळी भाषणे झाली.

Leave a Comment