अहमदनगर मार्केट बाजारभाव : २८- १२ – २०१९

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: नगर बाजार समितीत सध्या मेथी, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो या भाज्यांची मोठी आवक होत आहे. त्यामुळे त्यांचे दर चांगलेच पडलेले आहेत. तर दुसरीकडे बाजार समितीत गवारीच्या शेंगेची आवक घटली आहे. शुक्रवार (दि. २७) रोजी गवारीच्या शेंगेला २००० ते ६००० इतका ठोकध्ये भाव मिळाला आहे.

किरकोळमध्ये हाच भाव १०००० रुपयांपर्यंत गेला आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. याचा फटका गवार भाजीला बसल्याचे दिसून येत आहे.

तसेच सध्या महिन्यापासून वातावरण ढगाळ होत असल्याने गवारीच्या झाडांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे गवारीच्या शेंगा कमी निघत आहे.

नगर बाजार समितीत आवक कमी झाल्याने गवारीची शेंग चांगलीच महागली आहे. शुक्रवारी गवारीला २०००ते ६०००इतका भाव मिळाला, तर किरकोळमध्ये १०००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

अजून दोन महिन्यांपर्यंत असेच भाव राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव:

पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो ५०० -१२००, वांगी ५०० – १०००, फ्लावर ५०० – १५००, कोबी ६०० – १२००, काकडी ५०० – १२००, गवार २००० – ६०००, घोसाळे १००० – १५००, दोडका १००० – २०००, कारले १००० – १८००, भेंडी २००० – ३०००, वाल १००० – ३०००,

घेवडा १००० – २५००, तोंडुळे १०७० – २०००, बटाटे १००० – २२००, लसूण ९००० – १८०००, हिरवी मिरची १००० – २०००, शेवगा १४०० – १५००, डिंगरी १५०० – ३५००,भू.शेंग ४०००-६०००, लिंबू ५०० – १०००, आद्रक ३००० – ४०००, गाजर १००० – ३०००, दु.भोपळा ५०० – ८००, मका कणसे १००० – १५००,

शिमला मिरची १००० – १८०० मेथी १०० – ३००, कोथिंबीर २०० – ३००, पालक ६०० – ७००, करडी भाजी ४००-५००, शेपू भाजी ७०० – ९००, चवळी १००० – २०००, चुका,बीट ४० – ५०, वाटाणा २५०० – ३२००, डांगर ५०० – १२००, मुळे ६०० – ७००.

धान्य : गावरान ज्वारी ३७०० -४१००, बाजरी १७२६ – २१२२, मुग ३५००-४१५०, हरभरा-३४५०-३७५०, उडीद ३५००-६७००, मिरची ५३३५ – २०३७०, गहू २४६५ -, ३८००, सोयाबिन ३५०० – ४२५०, मका १७०१-१७५०, गुळ डाग २७००-४५००.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment