दुपारच्या सुट्टीत शाळेच्या किचनच्या शेडमध्ये मुलींना बोलावून शिक्षक करायचा हे कृत्य …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले ;- तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार वाघापूर येथील एका जिल्हापरिषद शाळेत घडला आहे.

तालुक्यातील वाघापूर येथील गंभीर वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नराधम शिक्षकाने अनेक मुलींची छेडछाड व अत्याचार करण्याच्या प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

वाघापूर येथील ग्रामस्थ एकत्र आले त्यांनतर या शिक्षकाने अनेक मुलींची छेडछाड व गलिच्छ प्रकार केल्याचे उघडकीस आले. दत्तू पिचड असे या शिक्षकाचे नाव आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघापूर गंभीरवाडी येथे अनेक मुलींची छेडछाड करणारा हा शिक्षक अनेक वेळा समज देऊन या शिक्षकाचे वागणे सुधारत नव्हते.

या नराधम शिक्षकास ग्रामस्थ व महिलांनी बेदम मारहाण करत चपलेचा प्रसाद दिला असून शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोपी शिक्षक काय काय कारनामे करतो याची कहाणी मुलींनी कथन केली आहे. दुपारच्या सुट्टीत शाळेच्या किचनच्या शेडमध्ये काही मुलींना बोलावून त्यांच्याशी हा शिक्षक असभ्य वर्तन करीत असे.

तसेच घरी सांगू नये म्हणून दमही देत असे, असेही या मुलींनी सांगितले. या शिक्षकाच्या कृत्याने संताप व्यक्त होत आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

 

Leave a Comment