नगर -पुणे रस्त्यावरील दुभाजक तोडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : नगर- पुणे महामार्गातील शिरूर ते नगर रस्त्यावर हॉटेल व्यवसायासह अन्य सुरु असलेल्या व्यवसायाचा धंदा जोरात व्हावा. यासाठी महामार्गावरील दूभाजक तोडून तेथे तो ओलांडता येतील अशी सोय करवून घेण्यात आल्याने गेल्या काही घटनांवरून हे ‘स्पॉट’ नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगर पुणे महामार्गावर अवैध क्रॉसिंग निर्माण केल्याने भर वेगाने येणारे वाहन ओलांडणाऱ्या वाहनावर धडकते त्यातून अनेकांच्या जीव गेला आहे.आशा दुभाजकामुळे चालू वर्षात ठिकठिकाणी अनेक अपघात होऊन १० हुन अधिक लोकांचे प्राण गेले आहेत.

पुणे-नगर महामार्गावर अनेक औद्योगिक कंपन्या असून वाहनांची व नागरिकांची या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर सतत वर्दळ असते. त्यातच महामार्गाच्या कडेला असणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपल्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे दुभाजक तयार केले आहेत.

या अनधिकृत दुभाजकामुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात होऊन त्यामध्ये सर्वसामान्यांचा हकनाक बळी जात आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असून, तेथे धोक्याच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु अपघात होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

महामार्गावर अपघातानंतर डोक्याला गंभीर इजा होऊन दुचाकीस्वारांचे मृत्यू होत आहेत.महामार्गावर प्रवास करणारी अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. कंटेनरसारखी वाहने रस्त्यावर बंद पडल्यानंतर रस्त्यावरच उभी केली जातात.

हॉटेल, धाब्यांवर थांबण्यासाठी कंटेनरचालक वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. रात्रीच्या वेळी हे कंटेनर न दिसल्यास त्यावर इतर वाहने आदळून अपघात होतात.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment