राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- भाजपने विधानसभा निवडणुकीआधी मेगाभरती केली होती. आता या मेगाभरतीतून आलेले नेते परतीच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. 

भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील हेही घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.विखे यांची भाजपमध्ये गोची झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुन्हा ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणारे राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक असल्याचे वृत्त ‘कट्टा न्यूज’ या वेबसाईटने दिले आहे.

 विखे पाटील यांनी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली असल्याचे देखील वृत्त आहे. खर्गे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विखे पाटलांनी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे कळवले असल्याची माहिती आहे.

विखे पाटील यांनी जरी इच्छा दर्शवली असली तरी अंतिम निर्णय हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हेच घेतील, असे विखे पाटील यांना कळवले गेले असल्याची माहिती या वेबसाईटने दिली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यासंदर्भात मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात कालच बैठक झाली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment