प्रवरा नदीत उसाने भरलेली बैलगाडी कोसळली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- येथील आगर गावच्या शिवारातील अगस्ती आश्रम परिसरातून अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेली बैलगाडी अगस्ती पुलाच्या वळणावर उतार असल्यामुळे थेट प्रवरा नदीत कोसळली.

हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दोन्ही बैल मात्र गंभीर जखमी झाले. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. महिन्याभरापूर्वीच महात्मा फुले चौकात आंबड येथील नागरिकाला बैलगाडी अंगावर आल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले होते.

हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !

उतारावर बैलगाडी थांबवणे शक्य होत नसल्याने असे अपघात होतात. रविवारी अगस्ती आश्रम परिसरात ऊसतोड सुरू होती. उसाची बैलगाडी खानापूरमार्गे मोठ्या पुलावरून जाणे अपेक्षित असताना बैलगाडी प्रवरा नदीवरील छोट्या पुलावरून आणली.

हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !

गाडी उतारावरून खाली आणत असताना दुपारी दोनच्या सुमारास पुलाच्या सुरुवातीच्या बाजूने बैलगाडी नदीत कोसळली. गाडीवर बसलेल्या ऊस वाहतूकदाराने उडी मारल्याने तो बचावला. दोन्ही बैल मात्र जखमी झाले.

हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार

नागरिकांनी जखमी बैलांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. अगस्ती साखर कारखान्याच्या शेतकी, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत मदत केली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment