अहमदनगर च्या राजकारणाबाबत आमदार रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्यात वापरण्यात आलेला महाराष्ट्र विकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी ठरला. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजश्री घुले यांची तर उपाध्यक्ष पदावर कॉंग्रेसचे प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करून कोणी आपल्यावर उपकार केलेले नाहीत. आपला आकडाच (सदस्य संख्या) असा होता की, त्याच्या नादीच कोणी लागले नाही,’ असा दावा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी येथे केला. 

हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !

नगरचे राजकारण एवढे सोपे नाही. मी ते जवळून पाहिले आहे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी आ. पवार नगरला आले होते त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडीची बैठक मंगळवारी नगरमध्ये पार पडली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 

हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !

नगरचे राजकारण सोपे नाही हे मी जवळून पाहिले आहे. पण मला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येथील लोकांनी समजून घेतलं, मला स्वीकारलं, हा माझ्यासाठी मोठा अभिमान आहे . त्यामुळे आगामी काळामध्ये मागे काय झालं याच्या फंदात पडायचे नाही आगामी काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचे व विकास कामे करायची यासाठी नियोजन करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …

यावेळी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, करण ससाणे, क्रांतिकारी पक्षाचे सुनील गडाख उपस्थित होते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment