अहमदनगरच्या युवक- युवतींना चिंता फक्त जोडीदाराची,करिअरपेक्षा रिलेशनशीपला अधिक महत्व !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहरातील युवा युवतींना शिक्षण , करिअर ऐवजी चालू असणाऱ्या रिलेशनशीपचीच अधिक चिंता असल्याचा अहवाल स्नेहसंबंध ‘ या सामाजिक संस्थेकडे प्राप्त झाला आहे.

हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द

या संस्थेने विविध विद्यालये , महाविद्यालयातील युवक – युवतींच्या मुलाखती घेऊन एक सर्वेक्षण केलं. त्यात मत व्यक्त करताना युवक – युवती करिअरपेक्षा आपल्या जोडीदाराबाबतच अधिक बोलत असल्याचे दिसून आले.

हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

नातेसंबंध बिघडत चालले आहेत , माणूस माणसाला पारखा झालाय . असं आपण नेहमीच म्हणतो . अनेकदा अनुभवतोही! याची आकडेवारी क्वचितच समोर येते. तरुण – तरुणींना स्वतःच शिक्षण, करिअर यांची चिंता कमी अन रिलेशनशीपचीच काळजी जास्त असल्याचे या संस्थेच्या अहवालातून उघड झालंय.

हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

हे धक्कादायक आहे. आजची तरुण पिढी ही करिअर ओरिएंटेड आहे असा एक समज आहे. आपण पुढे काय व्हायचय ? आपली आवड कशात आहे ? हे मिलेनिअर जनरेशनला बरोबर समजत असे आपण मानतो. पण या संस्थेच्या अहवालानं या बाबींना छेद दिलाय. या संस्थेने फोनद्वारेही या युवक – युवतींशी संपर्क केला.

हे पण वाचा :- खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !

नाते संबंधाबाबत १५४,मानसिक तणावाबाबत ५९,अभ्यास करिअरबाबत ४१, आपल्या प्रतिमेबाबत व्यक्तींनी आपली मते व्यक्त केली. ब्रेकअप, जोडीदाराच्या सवयी, भावनांमध्ये गल्लत, नकार पचविण्यात अडचण . अविश्वास याबाबतही युवक युवतींनी आपली मते व्यक्त केली.

हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

सोशल मिडीयाचा अतिवापर, कुटंबामध्ये संवादाचा अभाव, बिझी असलेले पालक, एकटेपणा, प्रेमभंग यामुळे मानसिक आजारात वाढ झाली असल्याचा अहवालही या संस्थेच्या सर्व्हेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. या युवक – युवती मध्ये ‘ प्रेम ‘ या रिलेशनशीपबद्दल मोठे आकर्षण दिसून आले.त्यामुळे करिअरला दुय्यम स्थान दिले असल्याचे दिसून आले आहे.

हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment